कोपरगावात कोल्हे गटाला पडले खिंडार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोपरगाव :- तालुक्याच्या दक्षिण भागातील बहादरपूर व अंजनापूर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

बहादरपूर गावातील कोल्हे गटाला मोठे भगदाड पाडून असंख्य युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करत त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

यामध्ये अंजनापूरचे भास्कर महाराज गव्हाणे, बहादरपूर ग्राम पंचायतचे उपसरपंच गोपीनाथ राहणे, बाळासाहेब राहणे, भाऊसाहेब राहणे, दशरथ पाडेकर, किरण रहाणे, नंदू पाडेकर, सतिष राहणे, सतेज पवार, आबा राहणे, रामनाथ पाडेकर, दत्तू खकाळे, गोरक्षनाथ खकाळे, दत्तू राहणे आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता व दूरदृष्टी फक्त आशुतोष काळे यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता आल्यापासून त्यांनी ग्रामीण भागात विकासाची गंगा आणली आहे.

मतदार संघातील प्रत्येक गावाचा व शहराचा विकास साधण्यासाठी आशुतोष काळे यांच्याशिवाय पर्यायच नाही अशी भावना संपूर्ण मतदार संघात तयार झालेली आहे.

त्यामुळे इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते युवानेते आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. परिवर्तनाचे वारे आज बहादरपूरपासून सुरु झाले आहे याचे लोन संपूर्ण मतदार संघात पोहोचणार असून तालुक्यात परिवर्तन होणार आहे.

आशुतोष काळे यांना आमच्या भागातून मोठे मताधिक्य देणार असल्याचे सांगता आशुतोष काळे यांचा विजय अटळ असल्याचे या कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले यावेळी आशुतोष काळे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24