आमदार वैभव पिचड आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अकोले – अकोलेत भाजपचे उमेदवार वैभवराव पिचड यांच्याकडे स्थावर – जंगम मालमत्ता व सर्व प्रकारचा उत्पन्नाचा “सोर्स’ ध्यानात घेता ते पाच कोटीचे मालक असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तर जवळपास कोटीच्या आसपास कर्जाचाही बोजा आहे.

स्वयंचलित अशी दोन कोटी 89 लाख तर वारसाने आलेली दोन कोटी 95 लाख रुपयांची मालमत्ता त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे. तर पत्नी पूनम यांच्याकडे 95 लाख रुपये मालमत्तेच्या पोटी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

मुलगी मधुरा, मुलगा ऐश्वर्य हे मात्र शिक्षण घेत असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे रक्कम दिसत नाही. मुंबई येथील एचडीएफसी बॅंकेमध्ये, शालिनी बॅंकेमध्ये बचत खात्याच्या रूपात, शिवाय ठेव रकमेच्या स्वरूपात स्वतःच्या नावे आणि पत्नीचे नाव नमूद केले आहेत.

तर राजूर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक, अकोले येथील आयडीबी, अकोले येथील सेंट्रल बॅंक, सुगाव बुद्रुक येथे जिल्हा सहकारी बॅंक या सर्व खात्यांचा तपशील त्यांनीनमूद केले आहेत. अकोले तालुक्‍यातील पाडाळणे येथे, त्रंबकेश्वर तालुक्‍यातील आंबई, येथे आणि राजूर येथील प्लॉट, नाशिक येथे निवास इमारत, अशाप्रकारचा तपशील त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत.

यापोटी दागिने त्यामध्ये दाखवलेले असून त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू आणि फोर्ड या दोन गाड्या दाखवलेल्या आहेत. शिवाय ट्रॅक्‍टर, सोने यांचा उल्लेख केलेला आहे. पत्नीच्या नावे सोन्याचा उल्लेख केलेला असून त्यांच्या नावावर इनोवा गाडी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24