विवाहित महिलेचे अपहरण करून बलात्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सांगोला:- तालुक्यातील कोळे येथे राहणारा पिंटू बापू मोहिते यास मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथील विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यनके मोरे यांनी दाेषी मानून १४ वर्षे सक्तमजुरी व ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

पीडित महिला ही मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथील राहणारी असून सणानिमित्त माहेरी हुलजंती येथे आली होती. ७ सप्टेंबर २०११ रोजी मुलासह सासरी मारोळी जात हाेती. या वेळी आरोपी पिंटू बापू मोहिते तिथे भेटला. त्यांची आधीची ओळख हाेती. त्यामुळे ती आराेपीसाेबत दुचाकीवर जाण्यास तयार झाली. नंतर आराेपीने तिला दम भरून आपल्यासाेबत बळजबरीने नेले. महिलेजवळ लहान मूल असल्यामुळे ती गप्प राहिली.

आरोपीने पीडित महिलेस मिरज तालुक्यातील बेडग या गावी नेऊन एका घरात डांबले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सदर महिलेने मंगळवेढा पोलिस स्टेशनला आराेपीविराेधात फिर्याद दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24