राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा जिल्ह्यात दौरा असल्याने, ते भंडारा विश्राम गृह येथे आले असताना,
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या पुढाकाराने
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन ४ लाख ५८ हजार ४९५ रुपये,
मजूर सहकारी संस्था भंडारा १ लाख ११ हजार १११ रुपये,
मच्छिमार सहकारी संस्था ९१ हजार ७७७ रुपये व कबीर पंथिय ५ हजार ५५५ रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
संकटकाळात मुख्यमंत्री सहायता निधीला जास्तीत जास्त मदत निधी द्यावा,
असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, कैलास नशीने,
सागर गणवीर, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे सर व्यवस्थाक संजय बूरडे, अजय मोहनकर,
सदाशिव वलथरे, सुनील शिवरकर, वासूदेव तिरमारे चर्तुभूज भानारकर,
अभिजीत वंजारी, विलास घाटबांधे, शैलेंद्र सतदेवे, रिना नागपूरे, नरेंद्र बूरडे आदी उपस्थित होते.