राज्यात दोन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुणे ;- येत्या दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या अनेक भागांत तसेच कोकणात व गोव्यात ७ आणि ८ ऑक्टोबर या दोन दिवसांत पाऊस पडेल.

मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह सरी बरसतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कुलाबा वेधशाळेनुसार यंदा थंडीचे आगमन लवकर होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड येथे या ऋतुबदलाचे ताजे संकेत मिळाले असून अपेक्षेपेक्षा आधीच हिमवर्षाव सुरू झाला आहे. पंजाब, हरियाणा परिसरात किमान तापमान आत्ताच १७ अंशापर्यंत खाली आले आहे.

राज्यात महाबळेश्वर येथे १६.४ अंश किमान तापमानाची नोंद झाली. तर नगर १७.८, नाशिक १८.६, बीड १८.४, औरंगाबाद १८.२, पुणे २०, सातारा -सांगली २० असे किमान तापमान नोंदवले गेले.

अहमदनगर लाईव्ह 24