केडगाव हत्याकांडातील  ‘ते’ राडेबाज पुन्हा रडारवर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सुमारे साडेचार हजार व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत या सर्व व्यक्तींकडून एका वर्षांसाठी बॉण्ड लिहून घेण्यात येत आहेत. आतापर्यंत तीन हजार व्यक्तींनी बॉण्ड लिहून दिले असून उर्वरित व्यक्तींकडून बॉण्ड लिहून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.

दीड वर्षभरापूर्वी घडलेल्या केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर दगडफेक व पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या तब्बल ९०० राडेबाजांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी दीडशेपेक्षा अधिक आरोपींना अटकही झाली होती.

न्यायालयीन कोठडीनंतर हे आरोपी सशर्त जामीनावर सुटले. मात्र, पुढील काळात काेणताही अनुचित प्रकार शहरात घडू नये, यासाठी पोलिसांनी या आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापैकी अनेकांकडून पुन्हा बॉण्ड घेण्यात आला आहे.


अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24