राहुरी :- तालुक्यात आ. शिवाजी कर्डिले हे मी १२०० कोटींची कामे केल्याचे सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात अनेक कामे प्रलंबित असताना ते खोटी माहिती देवून जनतेची दिशाभूल करत आहे. आ. कर्डिले सांगत असलेल्या कामांची जनतेने पाहणी केल्यास दूध का दूध होईल, असा विश्वास युवानेते नंदकुमार गागरे यांनी व्यक्त केला आहे.
गागरे म्हणाले, जनतेने कोणत्या पक्षाला मतदान करावे, हे त्यांचा अधिकार आहे. मीही कोणत्या पक्षाचा नाही. मात्र, लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा असते. तनपुरेंना कंटाळलेल्या जनतेने आ. कर्डिलेंना संधी दिली.
गेल्या दहा वर्षापासून येथील जनतेने आ. कर्डिलेंना निवडून दिलेले आहे. मात्र, त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. आजही अनेक प्रश्न येथे प्रलंबित आहे. अनेक भागात रस्ते नाहीत, कामांचे फक्त भूमिपूजन केले मात्र प्रत्यक्षात कामे सुरूच झाले नाहीत, अशा एक ना अनेक समस्या जनतेला भेडसावत असताना आ. कर्डिले यांनी निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर आपण १२०० कोटींची कामे केल्याचा दावा केला आहे.
आता प्रश्न असा पडतो की, जर तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित असताना नेमकी आ. कर्डिलेंनी ही १२०० कोटींची कामे केली कुठं? एकतर त्यांनी जनतेला ही कामे प्रत्यक्षात दाखवून द्यावी, किंवा जनतेने तरी प्रत्यक्षात जावून ही कामे कुठं झाली, याची खातरजमा करावी, असे आवाहन गागरे यांनी केले आहे.