अहमदनगर जिल्हयातुन हे ५३ अपक्ष उमेदवार ठरणार डोकेदुखी ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर  – विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही नशीब आजमावत आहेत. नगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या अपक्षांचे आव्हान राहणार आहे.

या वेळी तब्बल ५३ अपक्ष उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. याव्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही चार मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. दोन मतदारसंघांत एमआयएम पक्षाचे उमेदवार आहेत.

विशेष म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएम पक्षाने उमेदवारदेताना जिल्ह्याच्या राजकारणातही प्रवेश केला आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन विद्यमान महिला आमदारांसह अन्य चार महिलांचेही अर्ज आहेत. सोमवारी अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील निवडणकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

या वेळी बारा मतदारसंघांतून एकूण ११६ उमेदवार निवडणक रिंगणात आहेत. यामध्ये अपक्षांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघात सर्वाधिक १७ उमेदवार आहेत. यामध्ये सर्वाधिक उमेदवार सर्वाधिक म्हणजे १० अपक्ष उमेदवार आहेत.

या मतदारसंघातराष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार न देता क्रांतीकारी शेतकरी पक्षास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना अपक्षांचेही आव्हान राहणार आहे.

अपक्षांसह अन्य पक्षांचे उमेदवारही निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संगमनेर, नेवासा, नगर शहर आणि श्रीरामपूर या चार मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार न देता क्रांतीकारी शेतकरी पक्षास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना अपक्षांचेही आव्हान राहणार आहे . अपक्षांसह अन्य पक्षांचे उमेदवारही निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संगमनेर , नेवासा , नगर शहर आणि श्रीरामपूर या चार मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत प्रभावी ठरलेल्या वंचित बहजन आघाडीने जिल्ह्यातील ९ मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. यामध्ये अकोले, संगमनेर, शिर्डी, नेवासा, शेवगाव – पाथर्डी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत – जामखेड या मतदारसंघांचा समावेश आहे.

बहुजन समाज पक्षानेही दहामतदारसंघात उमेदवार दिले आहेत. या व्यतिरिक्त बळीराजा पक्ष, हिंदुस्तान जनता पक्ष, राष्ट्रीय संत संदेश पार्टी, जनहीत लोकशाही पक्ष, राईट टू रिकॉल व अन्य काही पक्षांचेही उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत.

 भाजप : ८, शिवसेना : ४, राष्ट्रवादी : ८, काँग्रेस : ३, वंचित | बहुजन आघाडी : ९, बसप : १०, महाराष्ट्र नवनिर्माण सेना : ४, एमआयएम : २, या व्यतिरिक्त राष्ट्रीय संत संदेश पक्ष, जनहित लोकशाही पक्ष, हिंदुस्तान जनता पक्ष, राईट टू रिकॉल, संभाजी ब्रिगेड, कम्युनिस्ट पक्ष, बळीराजा पक्ष, अंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, बहजन मुक्ती पक्ष, क्रांतीकारी शेतकरी पक्ष या पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

जिल्ह्यातील निवडणुकीत यंदा महिला उमेदवारांची संख्या मात्र अत्यल्प आहे. जिल्ह्यातील चार मतदारसंघातच महिला उमेदवार आहेत. यामध्ये कोपरगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे व शेवगाव – पाथर्डी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे निवडणुकीत आहेत.

याव्यतिरिक्त श्रीरामपूर व कोपरगाव मतदारसंघात प्रत्येकी १ आणि नेवासा मतदारसंघात २ अशा एकूण सहा महिला उमेदवार आहेत. याआधी २०१४ मधील निवडणुकीत जिल्ह्यात ९ महिला उमेदवार होत्या. या वेळी मात्र महिला उमेदवारांची संख्या घटली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24