कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६१व्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्र्यांकडून अभिवादन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सातारा, दि. ९ (जिमाका) : सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे

महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६१व्या पुण्यतिथीनिमित्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी प्राचार्य डॉ.भाऊसाहेब कराळे, ॲड.दिलावर मुल्ला, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24