पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बांधावर खत वितरणाचा शुभारंभ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

हिंगोली : पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड या हिंगोली दौऱ्यावर आल्या होत्या.

खरीप हंगाम जवळ आल्याने याप्रसंगी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रा.गायकवाड यांच्याहस्ते शेतकऱ्यांना बांधावर खत वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री प्रा.गायकवाड यांच्या हस्ते हिंगोली तालुक्यातील उमरा येथील अमृतेश्वर शेतकरी गट १ आणि २, हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील विजय शेतकरी गट १ आणि २ या  एकूण २५ टन खताचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांच्यासह शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

अहमदनगर लाईव्ह 24