आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारास सुरवात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- आ. संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास मंगळवारी (दि. १) सकाळपासून सुरुवात केली आहे. शहरात प्रभागनिहाय प्रचाराचे नियोजन केले असून प्रभाग क्रमांक १२ मधील प्रचाराचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणेश मंदिरात महाआरती करुन व नारळ वाढवून केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक अविनाश घुले, संपत बारस्कर, कुमार वाकळे, गणेश भोसले, विनित पाऊलबुधे, दिपक सुळ, ज्ञानेश्वर रासकर,दगडु पवार, निखिल वारे, मोहन कदम, रेश्माताई आठरे, उबेद शेख, संजय झिंजे, काका शेळके, प्रा. अरविंद शिंदे, आकाश दंडवते, योगेश गलांडे, बाळासाहेब पवार, अमोल गाडे, संभाजी पवार, विशाल पवार, राजेंद्र तागड यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आ . संग्राम जगताप यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवारी निश्चित झाल्याने उमेदवारीची घोषणा होण्यापूर्वीच त्यांनी प्रचाराचा शुभारंभ करत प्रभाग १२ मधुन प्रचारफेरी काढली त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले. शहरात महापालिकेच्या १७ प्रभागांमध्ये प्रभागनिहाय प्रचाराचा शुभारंभ केला जाणार असून प्रभागनिहाय प्रचाराचे नियोजन करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24