काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरातांकडे आहे इतकी संपत्ती पण चारचाकी एकही नाही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर :- संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रानुसार थोरात कुटुंबीयांकडे जंगम व स्थावर अशी सुमारे बारा कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यात दहा कोटींची स्थावर मालमत्ता आहे.

तर सुमारे दोन कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. परंतु थोरात यांच्यासह त्यांच्या कुटुंबाकडे एकही वाहन नसल्याचे म्हटले आहे.

बाळासाहेब थोरात हे पुणे विद्यापीठातून बीए झाले असून, पुण्यातील इंडियन लॉ सोसायटीच्या विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली आहे.

बाळासाहेब थोरात, पत्नी कांचन, मुलगी डॉक्टर जयश्री, मुलगा राजवर्धन असे त्यांचे कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबाकडे एकत्रितपणे रोख रक्कम, ठेवी, सोने अशी १ कोटी ९८ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

बाळासाहेब थोरात यांच्याकडे ८८ लाख ६६ हजार, त्यांच्या पत्नीकडे ६९ लाख, मुलीकडे १३ लाख ५९ हजार, मुलाकडे २७ लाख १४ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

त्यांच्या पत्नीकडे १ किलो १७० ग्रॅम सोने आहे. तर थोरात कुटुंबीयांकडे १० कोटी १० लाख रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता आहे. त्यात काही वडिलोपार्जित शेती आहे.

थोरात यांच्या नावावर ५ कोटी ६६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. संगमनेरमधील जोर्वे येथे थोरात व त्यांच्या पत्नीच्या नावे सुमारे १४ एकर शेती, संगमनेर शहर, जोर्वे येथे रहिवासी इमारत आहेत. त्यांच्याविरुद्ध एकही गुन्हा नसल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24