अकोले : अकोले विधानसभा मतदारसंघात मधूकर पिचड यांचे कट्टर विरोधक जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
अकोले तालुक्यातील जनतेचा कौल जाणून घेऊन राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. किरण लहामटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
डॉ. लहामटे यांना उमेदवारी जाहीर होताच डॉ. लहामटे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. डॉ. लहामटे हे गुरुवारी (३ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज अकोले तहसील कार्यालयात दाखल करणार आहेत.