आदित्य ठाकरेंविरोधात हा नेता लढणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळीतून राष्ट्रवादीचे सुरेश माने यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी वरळी मतदारसंघातून आपण विधानसभा लढवणार असल्याचे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

तसेच शिवसेनेच्या पहिल्या यादीत आदित्य ठाकरेंचे नाव होते. . वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरेश माने यांना उमेदवारी दिल्याची जोरदार चर्चा आहे. आपल्याला वरळीचा विकास करायचा आहे, मात्र सोबत महाराष्ट्रदेखील पुढे न्यायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी असून त्यासाठी काम करणार आहे. फक्त वरळी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करणार आहे.

मी प्रत्येक गावात प्रचार केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही माझा प्रचार करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर करताना शिवसैनिकांना केले होते. राष्ट्रवादीने सुरेश माने यांना वरळीमधून उमेदवारी दिली तर या दोघांमधील लढत रंगतदार होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24