काँग्रेस-राष्ट्रवादी पहिल्यापासूनच पराभवाने खचलेत- मुख्यमंत्री

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

धुळे : निवडणूक सुरु झाली आहे, काही दिवसांवर मतदान आले आहे. पण निवडणुकीत मजाच येत नाही. कारण समोर कोणी दिसतच नाही. आपले सर्व पहेलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहेलवानच दिसत नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नेते पहिल्यापासूनच पराजयाच्या मानसिकतेने खचले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. धुळे ग्रामीणमधील नेर येथे ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात त्यांनी जगातली सर्व आश्वासने देऊन टाकली. फक्त प्रत्येकाला ताजमहाल बांधून देण्याचे आश्वासन देणे बाकी राहिले आहे. पन्नास वर्षे खोटे बोल पण रेटून बोल अशा प्रकारचे त्यांनी राजकारण केले. जनतेचा नव्हे तर स्वतःचा फायदा करुन घेतला. गेल्या पाच वर्षात हे केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप लावू शकले नाहीत. आम्ही चोवीस तास जनतेकरीता काम केले. जनतेचा पैसा जनतेकडे नेला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24