जळगाव : आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही. भविष्यात दोन्ही पक्ष एकमेकांत विलीन होतील, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच केले होते. या वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी जळगावात खंडन केले.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही एकत्र काम करत आहोत. सुशीलकुमार शिंदे त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या संदर्भात माहिती सांगू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे.
त्यामुळे माझ्या पक्षाची स्थिती मला अधिक चांगली माहिती आहे, एवढेच मी सांगू शकेन, विलीनीकरण होणार नाहीच, असे स्पष्टीकरण खा. शरद पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले.