अहमदनगर :- विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. कारण माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कळमकर यांनी हाती शिवबंधन बांधलं. अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून संग्राम जगताप आणि कळमकर या दोन गटांमध्ये वाद सुरू होता.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या मेळाव्यात हा वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं. कळमकर यांना या कार्यक्रमानंतर धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर आता अखेर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
अभिषेक कळमकर हे शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत त्यांचं पक्षांतर हा राष्ट्रवादीला धक्का असल्याचं मानलं जात आहे.