पबजी गेमच्या आहारी गेलेल्या तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नागपूर :- मोबाइलवरील पबजी खेळाचे व्यसन लागल्यावर शैक्षणिक करिअर उध्वस्त होऊन नैराश्य आलेल्या नागपुरातील तरुणाने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली.

धाडीवाल लेआऊट परिसरातील अमन उर्फ बॉबी शंकर मानके (१९) गुरुवारी पहाटेच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडला.

जवळ असलेल्या सुयोगनगर चौकाजवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. आत्महत्येच्या आदल्याच दिवशीच अमनने हातावर ब्लेडने चिरे मारून घेतले होते. अमनने पूर्वी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला होता.

मात्र, त्याला पबजी खेळाचे व्यसन जडले होते. या खेळाच्या अतिआहारी गेल्याने त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24