डॉक्टर मुलीने केली पित्याची हत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अकाेला :- बाप-लेकीच्या भावनिक नात्याला तडा देणारी घटना गुरुवारी रात्री उशिरा रिजनल वर्क शॉपच्या मागील परिसरात घडली. एका डाॅक्टर मुलीने पित्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने पित्याचा मृत्यू झाला.

या घटनेला संपत्तीच्या वादाची किनार असल्याचे दिसून येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बाबुराव कंकाळ असे मृत पित्याचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी मुलगी रेश्मा बाविस्कर हिला ताब्यात घेतले आहे.

प्रादेशिक कार्यशाळेच्या मागे साईनाथ नगरमध्ये बाबुराव कंकाळ कुटुंबासह राहत. त्यांच्या कुटुंबात मुलगा सुरज, पत्नी आणि विवाहित मुलगी रेश्मा बाविस्कर आदींचा समावेश आहे. रेश्माचे लग्न २०१५मध्ये झाले हाेते. मात्र काही दिवसांपासून रेश्मा माहेरीच हाेती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24