डॉ. प्रकाश आंबेडकर यांची उद्या जाहीर सभा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जामखेड | वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण जाधव यांच्या प्रचारार्थ आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा रविवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी ४ वाजता कर्जत येथील बाजारतळावर होणार असल्याची माहिती कर्जत तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांनी दिली.

जाधव यांनी वंचित बहुजन जोडो अभियानाच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्व गावांतील कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला आहे. त्यांचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार १० ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे.कर्जतच्या सभेत आंबेडकर काय बोलतात, याकडे तालुक्यातील उमेदवार, कार्यकर्ते व मतदारांचे लक्ष लागले आहे.

या सभेसाठी प्रसिद्धीप्रमुख भगवान राऊत, जिल्हा संघटक नंदकुमार गाडे, तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, अरुण डोळस, विशाल पवार, विकास म्हस्के, महेश आखाडे, जावेदभाई पठाण, डॉ. अन्सारभाई शेख, मुबारक सय्यद आदी परिश्रम घेत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24