कर्जत-जामखेडमध्ये पवार-विखे सत्तासंघर्ष

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कर्जत – जामखेड मतदारसंघात पालकमंत्री प्रा. राम शिंदे व रोहित पवार यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीतील विजयानंतर प्रा. शिंदे यांची हॅट्ट्रिक होणार तर पवार यांचा विजय राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.

या लढतीला विखे आणि पवार यांच्यातील सत्ता संघर्षाचीही झालर आहे. त्यामुळे भाजप तसेच राष्ट्रवादीसाठी हा मतदारसंघ सेन्सिटिव्ह बनला आहे. जिल्ह्यातील मतदारसंघातून पवार कुटुंबातील सदस्याची पहिल्यांदाच एन्ट्री झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व कुटुंबियांसाठी हा विजय संपादन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

प्रा. शिंदे यांनी आयोजित केलेल्या कर्जत येथील सभेत ही लढत रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी नसून, ती ‘बारामती’ विरुद्ध ‘लोणी’ अशी असल्याचे अधोरेखित केले. त्यामुळे येथील सत्तासंघर्षची राज्यभर चर्चा आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये ना. शिंदे यांना विशेष परिश्रम घ्यावे लागले नाहीत.

विरोधी पक्षांमध्ये झालेल्या बंडखोरीचा त्यांना फायदा झाला. सध्या राष्ट्रवादीने सर्वांची मोट बांधत मोठे आव्हान दिले आहे. राम शिंदे यांना अनपेक्षितरित्या पवार कुटुंबातील उमेदवाराविरोधात लढा द्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही अत्यंत मुत्सद्देगिरीने त्याचा सामना केला जात आहे. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24