निघोज :- जनसंवाद यात्रेत जनतेचे दु:ख मला समजले. पाणी, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न मी सोडवणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांनी सांगितले.
माजी राज्यमंत्री अशोक सावंत, प्रभाकर कवाद, दादा कळमकर, मधुकर उचाळे, सरपंच ठकाराम लंके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी कळमकर, अनंतराव वरखडे, सुवर्णा मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा घोगरे यांचीही भाषणे झाली.
सभेअगोदर पदयात्रा काढण्यात आली. बाळासाहेब लामखडे व विकास शेटे यांनी सूत्रसंचालन केले. मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त शंकरराव लामखडे व विश्वास शेटे यांनी आभार मानले.