विखे – मुरकुटे यांच्या एकत्र येण्यानं कांबळे यांचे पारडे जड !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूरचे आ. भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचे काही नेते आणि माजी आमदार जयंत ससाणे यांचा गट दुखावला. त्याचे परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता होती. कांबळे एकदम एकाकी पडल्यासारखी स्थिती होती. अशा वेळी राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सूत्रे हाती घेतली.

विखे पाटील यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी अगोदर दूर करण्यात आली. विखे पाटील शिवसेनेत होते.  त्यामुळे त्यांना नाराजी दूर करणे शक्य झाले. त्यानंतर त्यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यांशी असलेले राजकीय वैर संपविण्याचा निर्णय घेतला.

मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांवरून विखे व मुरकुटे यांच्यात पराकोटीचे मतभेद होते. विखे यांचे कायम ससाणे गटाला पाठबळ मिळत असताना आणि ससाणे यांनी मुरकुटे यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव केला असल्याने त्यांच्यात कटुता होती. विखे पाटलांनी ही कटुता दूर केली. विखे यांची मुरकुटे यांनी भेट घेतली.

मुरकुटे यांनी बाळासाहेब विखे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे दोन्ही कुटुंबात कमालीचा संघर्ष झाला होता. विखे यांच्या ताब्यातील पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अहवालावरही मुरकुटे यांनी तोंडसुख घेतले होते. मुरकुटे यांनी डाॅ. अशोक विखे यांना राधाकृष्ण विखे यांना साथ दिली होती.

एवढी कटुता विसरून विखे यांनी मुरकुटे यांच्यांशी जुळवून घेतलं. श्रीरामपूर तालुक्यात मुरकुटे यांचं संस्थात्मक बळ असल्यानं त्याचा फायदा आता कांबळ यांना होणार आहे. मुरकुटे-विखे यांच्या एकत्र येण्याने श्रीरामपूरची जागा आता काँग्रेसकडून शिवसेनेकडे येण्याची खात्री झाली आहे. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24