संगमनेर : संगमनेरातील जनतेने निवडणूक हातात घेतली असून जनतेच्या सहकार्यामुळेच संगमनेरात परिवर्तन अटळ आहे असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले यांनी केले. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि. १० ऑक्टोबर रोजी संगमनेर तालुक्यातील मंगळापूर, चिखली, धांदरफळ बुद्रुक, कौठे धांदरफळ या ठिकाणी प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते.
गावोगावी जाऊन थेट मतदारांशी संवाद साधण्यावर महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले आणि कार्यकर्त्यांनी भर दिला आहे, तर ग्रामस्थांकडून महायुतीचे जोरदार स्वागत करण्यात येत असून महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचार सभांना वाढता प्रतिसाद मिळत आहे.. संगमनेर तालुक्यातील मंगळापूर, चिखली, धांदरफळ बुद्रुक व कौठे धांदरफळ येथे झालेल्या सभेत भाऊसाहेब वाकचौरे, दीपक वाळे, गोपीनाथ रुपवते, शंकर वाळे, सीताराम पवार, भारत हासे, सोमनाथ हासे, प्रकाश हासे, प्रकाश लहाने, मेमाने डॉ. कोल्हे, शेषराव देशमुख, बाळासाहेब कवडे, साहेबराव वलवे, हरिष साळवे, विलास कोकणे, विलास खताळ, योगेश खताळ, नेताजी घुले, बाबासाहेब घुले, वैभव घुले उपस्थित होते.
यावेळी संतोष रोहम, शरदनाना थोरात, बाबासाहेब कुटे, साहेबराव नवले यासह नेत्यांनी महायुतीची भूमिका मांडली. संगमनेर विधानसभा निवडणुकीचे रंग आता चढू लागले आहेत. महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले हे तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन प्रचार सभा घेत आहेत. त्याचबरोबर ते गावातील प्रत्येक मतदारांच्या गाठीभेटी घेत असून जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. नवले यांच्या सभेस ग्रामस्थ, महिला, तरुण यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.