गेल्या पाच वर्षांत कधी नव्हे तो एवढा मोठा विकास झाला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जामखेड : ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आहे. येथील सर्वसामान्य जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी तुम्ही कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. गेल्या पाच वर्षांत कधी नव्हे तो एवढा मोठा विकास झाला आहे. असे मत माजी पं.स.सभापती आशाताई राम शिंदे यांनी व्यक्त केले.

त्या खर्डा येथे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, महायुतीचे उमेदवार ना.प्रा.राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित चौक सभेत बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या सध्या विरोधक अनेक खोटी आश्वासने देत आहेत. मात्र तुम्ही कुणाचाही खोट्या भूलथापांना बळी पडू नका. आपल्या हक्काचा माणसाच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची आज गरज आहे.

तालुक्यातील काही शकुनी मामांनी बाहेरुन आयात उमेदवार आणला आहे. ते बाभळीचे झाड असून त्याला पाणी घालू नका, ते कधीही काटा टोचणारच आहे. असा घणाघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे नाव न घेता केला. यावेळी ना.शिंदे यांना खर्डा येथील मांढरा देवी वडार मंडळ व वडार समाजाच्यावतीने महिलांनी पाठिंबा दिला.

यावेळी पंचायत समितीच्या सदस्या मनिषा सुरवसे,बाजार समितीच्या उपसभापती शारदा भोरे, नान्नजच्या सरपंच विद्या मोहळकर, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता जगदाळे, मनिषा मोहळकर, माजी उपसरपंच भागवत सुरवसे, राजू डोके, युवा नेते योगेश सुरवसे, बिभीषण चौगुले, बाळासाहेब धोत्रे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कांबळे, माऊली सुरवसे, राहुल शिकेतोड, अनिल सुरवसे आदीसह परिसरातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24