धक्कादायक : अहमदनगरमध्ये युवकाचा दगडाने ठेचून खून !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जामखेड :- चार वर्षांपूर्वी उसने दिलेले एक लाख रुपये मागितल्याच्या कारणावरून खर्डा येथे बाळु बजरंग पवार या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणी एकूण पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थ व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी समजूत घातल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन बंद मागे घेण्यात आला.याबाबत बाळु पवार याची मावशी वेणुबाई बाजीराव काळे यांनी जामखेड पोलिसात फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बिभीषण वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, व राहुल गौतम तादगे (सर्व रा. खर्डा) या पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24