राहाता :- तालुक्यातील गोगलगांव येथील तरुण शेतक-याने सततची नापिकीमुळे आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून गुरूवारी (दि.३१) मध्यरात्री घरातच गळफास घेत जीवनयात्रा संपविली. रवींद्र लक्ष्मण मगर (वय ३०) असे या शेतक-याचे नाव असून तो अविवाहित होता. वडिलाच्या निधनानंतर तो आपल्या वृध्द आईसोबत राहत होता.
रवींद्रला गोगलगांव येथे अवघी तीन एकर शेतजमीन आहे. वेळेत पाऊस झाला नाही म्हणून या शेत जमिनीत पेरलेले व्यवस्थित उगवले नाही. जे उगवले ते सध्याच्या अतिवृष्टीमुळे पदरी पडले नाही. यामुळे रवींद्र हा वैफल्यग्रस्त होता.
त्यातच दिवाळी सणाकरीता कुटूंबासाठी आणि बहीण, भाच्यांना काहीच घेण्याची ऐपत नसल्याने तो ताणतणावात होता. यातूनच गुरूवारी मध्यरात्री वृध्द आई घरात झोपल्यानंतर रवींद्र्रने घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेवून जीवनयात्रा संपविली.