जामखेड : ज्या बारामतीकरांनी कर्जत व जामखेड तालुक्यातील बळीराजाच्या हक्काचे पाणी येऊ दिले नाही ते पाणी ना.राम शिंदे यांनी आणले. ज्यांनी पाणी आवडले त्यांना थारा देऊ नका. जिल्ह्यासह कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात बाहेरचे उसनं नको, आमचं ते आमचचं असत.
कर्जत-जामखेड मतदार संघात बारामतीचं अतिक्रमण होऊ देणार नाही. पार्थ पवार पेक्षाही रोहित पवार यांची वाईट परिस्थिती करू. असे मत गृहनिर्माण मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त कले.
महाराष्ट्र शासन व केंद्रशासन मान्यताप्राप्त जामखेड नगर परिषद येथील प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे २०२२, अंतर्गत २८० सदनिकांच्या प्रकल्पाचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व मंत्री गृहनिर्माण मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या हस्ते भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गृहनिर्माण मंत्री ना. विखे पाटील म्हणाले गृहनिर्माण मंत्री झाल्यापासून म्हाडाच्या अंतर्गत पहिली योजना ही नगर जिल्ह्यातील जामखेडसाठी सुरूकेली आहे. बाहेरील आलेले अतिक्रमण परत कसे पाठवयाचे ते विखे पाटील यांना चांगले माहीत आहे.
ना.शिंदे तुम्ही त्यांची काळजी करु नका तुम्ही एकटे नाहीत, तुमच्या बरोबर भारतीय जनता पक्षाचे सर्व नेत्यासह विखे कुटुंब आहे.. यावेळी ना.शिंदे म्हणाले की, प्रत्येकाला असे वाटते आपलं एक चांगल शहराच्या ठिकाणी हक्काचे घर असावे. याचाच विकार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांसाठी घर मिळावं ही भावना व योजना मांडली.
राज्याच्या प्रत्येक विभागातून योग्य त्या सुविधा उपलब्ध झालं पाहिजे याकरिता मूलभूत कामे करत सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला.जामखेड शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उजणी धरणातून दहीगाव येथून ११७ कोटींची पाणीयोजना मंजूर केली.
त्या कामांचे टेंडर लवकरच पूर्ण केले जाईल. विविध विकास कामामुळे जनतेला थोडा फार त्रास होत आहे परंतु तो सहन करावा, असेही ना.शिदे म्हणाले.