LIVE : सुजय विखेंच्या विरोधात राधाकृष्ण विखे प्रचार करणार नाहीत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई :- सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर आज विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमासमोर येत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

सुजयच्या विरोधात प्रचार करणार नाही, मी नगरला प्रचाराला जाणार नाही, माझ्याबद्दल जर राष्ट्रवादीला संशय असेल तर मी प्रचार कसा करु? – राधाकृष्ण विखे पाटील

काँग्रेसशी माझी बांधिलकी, ते सांगतील ते मी करेन, तोच निर्णय मान्य – राधाकृष्ण विखे पाटील

पवारांच्या मनात विखेंबद्दल अजूनही द्वेष आहे, प्रचाराला जाऊन संशय नको, त्यामुळे नगरमध्ये मी प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

पवारांच्या मनात विखेंबद्दल अजूनही प्रचंड द्वेष – राधाकृष्ण विखे पाटील

नगरमध्ये शरद पवारांनी आधीच शंका उपस्थित केली, त्यामुळे प्रचाराला जाणार नाही, नगरमध्ये मी प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

बाळासाहेब थोरांताना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही, ते काही हायकमांड नाहीत, त्यावर नंतर बोलेन – राधाकृष्ण विखे पाटील

नगरमध्ये राष्ट्रवादीचा मी प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

शरद पवारांनी बाळासाहेब विखेंबद्दल जे विधान केलं, त्याने निश्चितच मला दु:ख झालं – राधाकृष्ण विखे पाटील

लोकसभा निवडणुकीबाबत माझ्या मुलामुळे सर्व संघर्ष उभा राहिला हे म्हणणं चुकीचे आहे, काँग्रेस पक्ष म्हणून काही जागांची मागणी आम्ही केली. त्यात अहमदनगरची जागा होती – राधाकृष्ण विखे पाटील

डॉ. सुजय विखेंनी जो निर्णय घेतला, तो त्याचा स्वत:चा निर्णय, विरोधी पक्षनेता म्हणून आघाडीला गालबोट लावण्याचा काम मी कधीही केलं नाही – राधाकृष्ण विखे पाटील

शरद पवारांनी हयात नसलेल्या बाळासाहेब विखे पाटलांबद्दल वक्तव्य करणं चुकीचं – राधाकृष्ण विखे पाटील

मुलासाठी संघर्ष झालाय असं म्हणणं चूक : राधकृष्ण विखे पाटील

माध्यमांमधून जे काही सांगितलं जात आहे, मी ठरवलं होतं की सर्व प्रतिक्रिया आल्यानंतर आपली भूमिका मांडेन – राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24