शरद पवार मैदानात मंगळवारपासून मराठवाडा दौऱ्यावर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील जुने सहकारी, नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 

पक्षाला सावरण्याबरोबर बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यासाठी पवार १७ सप्टेंबरपासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. सहा दिवस मराठवाडा पिंजून काढून पक्षाला उभारी देऊन जनतेचा विश्वास याद्वारे संपादित करणार आहेत. 

लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना-भाजपात प्रवेश केला. नेत्यांची यादी दिवसेंदिवस लांबत जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24