पारनेर : सत्ता असो अथवा नसो जनसेवेची कास धरून विकासकामे करीत असतो. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलो असल्याचे प्रतिपादन जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले.पारनेर शहरातील पारनेर ते लोणी हवेली रस्ता व मटण मार्केटचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत चेडे हे होते.यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे,नगराध्यक्षा वर्षा नगरे, उपाध्यक्ष चंद्रकांत चेडे, गंगाराम बेलकर, सोन्याबापु भापकर, सुनिल थोरात, शंकर नगरे, सरपंच बाळासाहेब रेपाळे,लहु भालेकर, उज्वला कोल्हे,नगरसेवक नंदकुमार देशमुख, विशाल शिंदे, विजेता सोबले,मालन शिंदे, सुरेखा भालेकर,सतिष पिंपरकर,विलास सोबले आदी उपस्थित होते.
यावेळी झावरे म्हणाले की माजी आमदार.स्व.वसंतराव झावरे यांच्या माध्यमातून पारनेर शहरात मोठी कामे केली असून, पारनेरकरांवर नेहमीच प्रेम असल्याचे सांगितले तसेच राजकारण समोर ठेऊन कुठलीच कामे केली नाही.
आमचे कर्तव्य मानून विकास कामे करीत आहोत. आजकाल निवडणुकीचा व्याख्या बदलती आहे. सत्ता जास्त दिवस राहिल्यावर मी पणा वाढतो तोच प्रकार पारनेर तालुक्यात होत आहे.यावेळी चेडे म्हणाले की, शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने पाच कोटी रूपयांचे विकास आराखडा मंजुर असून केवळ राजकरणासाठी काही अपप्रवृत्ती यास विरोध करीत आहेत. तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे म्हणाले, नगरपंचायतच्यावतीने चांगले काम सुरू आहे. मात्र पारनेर शहरात काही नेते राजकारण करीत असल्याचे दिसत आहे.