राहुल गांधींना निवडणूक कुठली हेच माहीत नाही:मुख्यमंत्री

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुसद, आर्णी/दिग्रस/चांदूर रेल्वे (अमरावती) : महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या दोन सभा झाल्या; परंतु त्यांचे भाषण अद्याप लोकसभा निवडणुकीतलेच आहे.त्यामुळे त्यांना विधानसभेची निवडणूक आहे हेसुद्धा माहीत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावर चांदूर रेल्वे (अमरावती) येथे तोंडसुख घेतले.


यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कुठलीच चुरस उरली नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानसभेच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सध्या काँग्रेस पक्षाकडे बोलायला अन् कर्तृत्व दाखवायला नेता नाही आणि दुसरीकडे राष्ट्रवादीकडे नेत्याशिवाय कुणीच नाही, अशी कोपरखळी मारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा समाचार घेतला.

अहमदनगर लाईव्ह 24