उस्मानाबाद / बार्शी / करमाळा : ‘होय, मी नागरिकांना १० रुपयांत जेवण देण्याचे आश्वासन दिले आहे आणिते देणार. निश्चितच देणार. त्यात खडे टाकू नका. एक रुपयात आरोग्य तपासणीही करून देणार आहोत.
मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यावरही टीका करत आहेत. हवी असेल तर तुमचीसुध्दा एक रुपयात डोक्यापासून तळपायापर्यंत आरोग्य तपासणी करून देतो, असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पवारांना काढला.