छत्री,रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स, कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई दि.15 : राज्यात लॉकडाऊनच्या काळात करावयाच्या उपायांच्या  संदर्भात आज शासनामार्फत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली.

त्यानुसार येणारा पावसाळा लक्षात घेऊन छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला आहे.

हा आदेश 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू राहील. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक 2  मे 2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24