पारनेर : विधानसभा उपसभापती यांच्या विरोधात पारनेर मतदारसंघातुन विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या लंकेनीं भाळवणी येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात विजय औटी यांच्यावर गंभीर आरोप केला.
विजय औटी हे विकास कामाच्या नावाखाली ठेकेदाराकडून बळजबरीने कमिशन घेत असल्याचा आरोप केला असून वेळप्रसंगी त्याची व्हिडिओ क्लिप देखील जनतेसमोर ठेवणार असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.
निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेर मतदारसंघातील उमेदवारीचे दावेदार आहेत. विजय औटी हे कमिशन मागत असल्याची व्हिडिओ क्लिप वेळ आल्यावर जनतेसमोर ठेवणार अशी प्रतिक्रियाही निलेश लंके यांनी दिली आहे.
पारनेर मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती आणि शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निलेश लंके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
निलेश लंके यांना उमेदवारी देण्याचे संकेत देखील राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघातून उमेदवारीचे संकेत देताच निलेश लंके यांनी विजय औटी विरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.