महाराष्ट्राचे साहित्य’रत्न’ निखळले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई, दि. 18 :- महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील अमूल्य असे साहित्य ‘रत्न’ निखळले अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी मनाला खूप वेदना देऊन जाणारी आहे. ते साहित्य विश्वातले अमूल्य असे रत्न होते.  त्यांनी त्यांच्या साहित्यातून, नाटकांमधून लहान मुलांना, मोठ्यांना निखळ आनंद दिला.

आमच्या पिढीतल्या लहानांचे भावविश्व साकारले, महाराष्ट्राचे साहित्य- नाट्य क्षेत्र समृद्ध केले. एकीकडे अनेक मानाचे पुरस्कार मिळत असता

नाही  रत्नाकर मतकरी हे रसिकांना निखळ आनंद देण्यासाठी सच्चेपणाने नवनवीन साहित्य निर्मिती करत राहिले. त्यांचे निधन निश्चितपणे धक्का देणारे आहे. महाराष्ट्राचे अमूल्य साहित्य’रत्न’ निखळले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24