रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे एका चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई, दि 18: “बाल नाट्य ते भयकथा असा विस्तृत पट आपल्या लेखणीतून  साकारणारे ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक,चित्रकार, आस्वादक, विज्ञानवादी रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे,

एका चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकला आहे”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

“मतकरी यांच्या रंगभूमीवरील बहुमूल्य योगदानाचा गौरव, राज्य शासनाच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काराने करण्यासाठी, मार्च महिन्यात निवड समितीने शिफारस केली होती,

परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू झाल्याने पुरस्काराची घोषणा आणि  प्रदान समारंभ होण्यापूर्वीच मतकरी आपल्याला सोडून गेले, याचे अतीव दुःख आहे.

त्यांचे साहित्य, नाट्य क्षेत्रातील योगदान तसेच त्यांचे पुरोगामित्व रसिकांच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने साहित्य आणि रंगभूमी  क्षेत्रात भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे “, असेही देशमुख यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24