मुंबई दि.18: राज्यात 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत गेल्या चार दिवसात 62 हजार 916 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
15 मे 2020 रोजी 5,434 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास आली. तर 16 मे 2020 रोजी 8,268 ग्राहकांना, 17 मे 2020 रोजी 20,485 ग्राहकांना आणि 18 मे 2020 रोजी 28,729 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास आली.
मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 5 हजार 221 अनुज्ञप्ती सुरू आहेत.
राज्यात दि.15-05-2020 पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्य विक्री सेवा देण्यात येत आहे. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
तथापी IOS प्रणलीबाबत संकेत स्थळावर अडचणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दुर करण्यात येत आहेत
तो पर्यन्त मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निर्देशनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दरोराज मद्य सेवन परवाने Offline पध्दतीने देण्याची सोय करण्यात आली आहे.
सदर मद्य सेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकताता. तरी मद्य विक्री दुकानासमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.