कर्जत-जामखेड मतदार संघातून भाजपाचे उमेदवार ना. प्रा. राम शिंदे ४ ऑक्टोबर रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ना. शिंदे यांच्या प्रचारार्थ साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले हे कर्जतला पहिल्यांदाच येणार आहेत.
माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या वतीने मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. विरोधकांना कडवे आव्हान देण्यासाठी साताऱ्याचे उदयनराजे भोसले कर्जतला येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले विरोधकांवर कोणती टिकेची तोफ डागणार याकडे लक्ष लागले आहे.