नाशिक : विषारी सापाने चावा घेतल्याने आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. ही घटना होमपाडा (नाचलोंढी, ता.पेठ) येथे घडली. पहाटेच्या सुमारास बालिका साखर झोपेत असताना तिला सापाने चावा घेतला होता. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वैशाली संदीप चौधरी असे मृत बालिकेचे नाव आहे. गुरुवारी (दि. ३१) पहाटेच्या सुमारास वैशाली आपल्या कुटुंबीयांसमवेत झोपलेली असताना ही घटना घडली. अचानक तिच्या डाव्या कानास विषारी सापाने चावा घेतला.