मृत बहिणीच्या मृतदेहाकडे एकटक पहात ‘ती’ बसली दहा दिवस!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नाशिक: मयत झालेल्या बहिणीच्या मृतदेहाजवळ मोठी बहीण तब्बल दहा दिवसांपासून बसून राहिल्याची धक्कादायक घटना भगूर येथील विजयनगर परिसरात घडली. परिसरात दुर्गंधी सुटल्याने हा प्रकार उघडकीस आला. या दोन्ही बहिणी मनोरुग्ण असल्याचे बोलले जात आहे. 

कविता दिगंबर बागूल (वय ४२, रा. पंचमोती सोसायटी, विजयनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी (दि.३१) स्थानिक नागरिकांना घरातून दुर्गंधी येत असल्याने महिलांचे नातेवाईक रवींद्र रमेश खरोटे यांना कळविले. खरोटे यांनी घरात जाऊन पाहिले असता कविता बागूल या मृत झाल्याचे निदर्शनास आले, तर मीना दिगंबर बागूल (वय ४४) ही मृत बहिणीच्या मृतदेहाकडे एकटक पहात असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयनगर येथील पंचमोती सोसायटीत या दोन्ही बहिणी राहात होत्या. यापैकी कविता बागूल अविवाहित, तर मीना बागूल विवाहित होत्या. कविता हिचा अंदाजे दहा ते अकरा दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा. मृत्यू झाल्यानंतर दुसरी बहीण गुरुवारपर्यंत शेजारीच बसलेली होती. घरातून दुर्गंधी सुटल्याने ही घटना उघडकीस आली. 

अहमदनगर लाईव्ह 24