श्रीरामपूर : सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर खाली आले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या कांदा दराने अचानक उसळी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातल्या अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याने पुन्हा एकदा पन्नाशी गाठल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीशे समाधान पसरले आहे.