अहमदनगर : शहरातील घासगल्ली भागात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वा.सुमारास घडली. याबाबत कोतवाली पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याचे पो. कॉ. शहीद सलीम शेख गस्तीवर असताना त्यांना अनस मोहम्मद लुकमान खत्री (वय १९), मोहम्मद अबीद हारून खत्री (वय २१, दोघे रा. गोविंदपुरा), आकाश अरुण पंचमुख (वय २१), सुरज रमेश पंचमुख (वय १९, दोघे रा. साईराम सोसायटी, कल्याण रोड) व प्रशांत बलभीम गावडे (वय १९, रा. भावनाऋषी सोसायटी) हे आपसात हाणामारी करताना आढळून आले.
पो.कॉ.शहीद शेख यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.