बाळासाहेब थोरात म्हणतात जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपची सत्ता येत असल्याचं दाखवण्यात आलंय, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अक्षरशः सुपडासाफ झाल्याचंही सर्व्हेत दिसून येतंय.

पण परिस्थिती वेगळी असून जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

मतदानानंतर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाकडे केली.

जनतेच्या मनात कायम संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असल्याने ही मागणी केल्याचं थोरात यांनी सांगितलं. सर्व्हेतून दिले जाणारे अंदाज कल्पनेच्या पलीकडचे आहेत, मात्र खरी वस्तूस्थिती वेगळी आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24