चंद्रपूर : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक तालुका व ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेली कामे,
साप्ताहिक मजूर उपस्थितीची प्रगती पथावरील कामे, वृक्ष लागवड योजनेंतर्गत येणारी कामे, गाळ काढणे, जलसंधारणाची कामे, रोप निर्मिती आदी कामाचा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विविध विभागाकडून आढावा घेतला.
नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीला खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे उपस्थित होते.
मनरेगातून बांबूची लागवड करावी जेणेकरून शेतकऱ्यांना, महिलांना व बेरोजगारांना आर्थिक लाभ मिळू शकेल, त्यांचे जीवनमान उंचावेल यासोबतच वृक्ष लागवड योजनेअंतर्गत कृषी व वनविभाग,
सामाजिक वनीकरण विभागाला रोपवाटिका, बांबू लागवडीसाठी नियोजन करून जास्तीत जास्त मजूरांना काम मिळेल यासाठी विभागातील अधिकाऱ्यांना सूचनाही त्यांनी दिल्या