प्रतिभा पाचपुतेंसह चार महिलांविरोधात गुन्हा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदे | काष्टी येथील मतदान केंद्र २८० मध्ये बळजबरीने घुसून मतदान कंट्रोल मशीनची पूजा करून त्याचा फोटो काढल्याची तक्रार केंद्राध्यक्ष सीताराम नाना घोडके यांनी दिल्यानंतर भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांची पत्नी प्रतिभा पाचपुतेंसह अन्य चार महिलां विरोधात मंगळवारी पहाटे श्रीगोंदे पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिभा बबन पाचपुते व इतर अनोळखी चार महिला (सर्व राहणार काष्टी) यांनी २१ ला सकाळी सात वाजता मतदान सुरू होण्याच्या वेळेला मतदान केंद्रात येऊन मशीनची पूजा केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24