साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला. पण सातारच्या छत्रपतींच्या गादीबद्दल आम्हाला आदर आहे. साताऱ्याला जाऊन विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील यांची भेट घेणार आहे. तसंच तिथल्या जनतेचा आभार मानण्याचा प्रयत्न करणार आहे.
उद्याच साताऱ्याला जाण्याचा प्रयत्न करणार आहे, असं पवार म्हणाले. साताऱ्याच्या सभेत ५० हजारांवर लोक आले होते. त्यांना निराश करणं योग्य नव्हतं. यामुळे पाच मिनिटं असो की दहा मिनिटं त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं होतं, असं पावसातील सभेबाबत पवार म्हणाले.