यवतमाळ: जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रहारचे उमेदवार गुलाबराव पंधरे यांच्या प्रचारासाठी राळेगाव येथील जाहीर सभेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापंक बच्चू कडू यांनी भाजप व कांग्रेस वर टीका केली.
कांग्रेसने आधी शेतकरी वर्गाला लुटले व आता भाजपचे सरकार लुटत आहे. त्यामुळे सामान्य माणूस हा मागे राहत आहे. अशी टीका प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडु यांनी राळेगाव येथील सभेत केली. काँग्रेस व भाजपने आजपर्यंत जे केले नाही ते प्रहार ने केले.
सरकारने शौचालय बांधून दिले परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे स्वामिनाथन आयोग लागु केला नाही असेही वक्तव्य केले सभेत केले. यावेळी प्रहारचे बबलू जनजाळ प्रमोद कुदळे गुलाब पंधरे हे उपस्थित होते.