पारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुजित झावरे यांना अनेक पदे दिली असताना झावरे यांनी पक्षाशी गद्दारी केल्यााचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी पत्रकार परिषदेत केला.
पारनेर येथे झालेल्या सुजित झावरे यांच्या संवाद मेळाव्यात झावरे यांनी राष्ट्रवादी पक्ष व नेत्यांवर टीका करीत भाजपवासी होण्याचे जाहीर केले.
या मेळाव्यात माजी विधानसभा सभापती दिलीप वळसे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांच्यावर झावरे यांनी टीका केली होती.
या टीकेचा तरटे यांनी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. या वेळी तरटे यांनी, झावरे यांना पक्षाने पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद दिले तसेच २०१४ साली विधानसभेची उमेदवारी दिली.
पक्षाने भररून पदे दिली असताना झावरे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करून पक्ष सोडण्याचे सूतोवाच केले, ही पक्षाशी गद्दारी अल्याचा आरोप तरटे यांनी या वेळी केला.