मुंबई, दि. 24 : वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा देताना रमजान ईदचा आनंद घरी राहूनच साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
जग व देश कोरोना नावाच्या महाभयंकर संकटातून जात असताना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुस्लिम बांधवांनी संयम पाळून आपले आतापर्यंत सगळे धार्मिक कार्यक्रम घरीच पार पाडले. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही.
याही पुढे अशाच प्रकारच्या संयमाची अपेक्षा आहे.
उद्या ईदची नमाज अदा केल्यानंतर प्रत्यक्ष गळाभेटी, भेटीगाठी घेण्यापेक्षा भ्रमणध्वनीवरुन नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्याव्यात, असेही आवाहन श्री. शेख यांनी केले आहे.